Menu

छुपा मनुवाद :

मेधाताई ज्या परिवारात वावरतात त्या परिवारात नथुराम गोडसेचे उदात्तीकरण अजूनही केले जाते आणि म. गांधींच्या निर्जीव पुतळ्यावर गोळ्या झाडून विकृत-आसूरी आनंद लुटला जातो, हे खरे नाही काय ? एक ब्राह्मण म्हणून मेधाताईंना हे गैर वाटत नाही काय ? जाहीरपणे या कृत्याचा त्या निषेध करतील काय ? केला काय ?

मेधाताई विचारतात ना आजच्या ब्राह्मणांचा मनुस्मृतीशी काय संबंध ? संबंध नाही ना? मग करा ना तुम्ही उघडपणे मनुस्मृतीचा धिक्कार आणि कळूद्यांना मनुस्मृतीचे स्त्री-शूद्रांविषयीचे खरे रूप !

          वरील आवाहनावरून हे स्पष्ट होते की, खासदार मेधा कुलकर्णी महोदयांना सर्व जातीपंथांनी विभागलेला हिंदू धर्म हवा आहे. चातुर्वर्णाची चौकट मजबूत करणाऱ्या मनुस्मृती मधून नेमके काय चांगले निवडावे; ज्याने संपूर्ण हिंदू समाज विभाजित करून; जाती-जातीमध्ये संघर्ष निर्माण केला. त्यातले वानगी दाखल काही श्लोक स्त्रियांबद्दल लिहिले गेले आहेत. ते पुढे दिले गेले आहेत.

१) “लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते, हे तिने कायम ध्यानात ठेवावे. [५/१५२]

२) “पती सदाचारशून्य असो, तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.” [५/१५४]

३) “आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऐका. बाल्यावस्थेत मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही

स्वतंत्रपणे करू नये.” [५/४७]

४) “स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये.” [५/४८]

५) “स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये.” [५/१६२]

६) “पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे.” [५/१६८]

७) “स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतात.” [९/१८]

खासदार महोदयांनी जर मनुस्मृती वाचली असती तर त्यांनी मनुस्मृतीचे समर्थन कधीच केले नसते. अशा मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात लावण्याचा घाट रचण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *