Menu

घटना व ब्राम्हणवाद : परस्पर विरोधी विचारधारा

मुक्तीविमर्शचा अंक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर प्रकाशित हाेत आहे. स्वाभाविकपणे हा जनतेसमाेर जे प्रश्न निर्माण झालेले त्यावर चर्चा करण्याचा हा प्रयत्न आहे. निर्माण झालेल्या प्रश्नाचा उहापाेह व विश्लेषण हा जनतेला निवडणुकीमध्ये याेग्य निर्णय घेण्यास उपयाेगी ठरेल. तथापि 2014 नंतर जी नवीन आव्हाने देशासमाेर व महाराष्ट्रा समाेर उभे झाली आहेत. नवीन आव्हानांची गंभीरता व तीव्रता लक्षात घेवून दाेन परस्पर विराेधी विचारसरणींना मानणा-्या आघाड्या जनतेसमाेर उभ्या आहेत. काही स्वतंत्र पक्ष तिसरी व चाैथी आघाडी सुद्धा एक विशिष्ठ विचारसरणी व कार्यक्रम घेवून जनतेसमाेर उभी आहे.
मुक्ती विमर्श चा अंक प्रामुख्याने ह्या आघाडीच्या विचारसरणीची व कार्यक्रमाची चिकित्सा करत आहे. 2014 नंतर जी आव्हाने राजकीय पक्ष व जनते समाेर उभे झाले आहेत ही प्रामुख्याने घटनेशी संबंधित आहेत. घटनेच्या प्रस्तावनेमध्ये (Preamble) देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक रचनेची तत्वे स्पष्टपणे मांडली आहेत. प्रास्ताविकामध्ये घटना हे मांडते की, लाेकशाही, धर्मनिरपेक्षता,समाजवाद जनतेचे प्रतिनिधी आधारित सरकार ह्या चार तत्वांवर राज्याचे शासन आधारित राहील. राज्याचे शासन लाेकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीव्दारे चालेल ते राजेशाहीच्या मार्गाने चालणार नाही. ही भूमिका घटना प्रस्तुत करते. शिवाय राज्य धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे राज्य एका विशिष्ठ धर्माच्या शिकवणुकीच्या आधारावर चालणार नाही. हे ही मान्य करते. ह्याशिवाय सरकार समाजवादी तत्वावर म्हणजे अशा अर्थव्यवस्थेवर आधारित राहील जी समाजवादी स्वरुपाची असेल. घटनेची प्रस्तावना ह्या तत्वाच्या आधारावर काही उद्दिष्टे सुद्धा पूर्ण करण्याची जबाबदारी राज्यावर व सरकारवर बंधनकारक ठरवते. राज्यात जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीव्दारे समाजामध्ये न्याय्य (सामाजिक, आर्थिक व राजकीय), स्वातंत्र्य (विचारांचे, धर्माचे, व्यक्तीचे), समानता (सामाजिक दर्जा, संधी), व बंधुत्वाची भावना (व्यक्तीचे मूल्य व राष्ट्राची एकता) वाढविण्याची व जाेपासण्याची जबाबदारी सरकारवर देते. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही उद्दिष्टे धर्मनिरपेक्ष व लाेकशाही प्रणीत मार्गाने पूर्ण करण्याची जबाबदारी राज्यावर देते. ह्याशिवाय मार्गदर्शक तत्वां ध्ये (Part -IV, Article 36-51) सरकारने जनतेच्या कल्याणासाठी धाेरणे राबवावी हेपन निश्चित करते.
आपल्याला हे स्पष्ट दिसते की, 2014 नंतर मागच्या दहा वर्षांमध्ये तात्विक पातळीवर व कृतीमध्ये राज्याची वेगळी संकल्पना मांडून ती राबविण्याचे प्रयत्न जाेमाने केले जात आहेत. घटना ज्या तत्वावर आधारित आहे त्याऐवजी घटनेला पर्यायी तत्वज्ञानाचा आधार देण्यात येत आहे व काही बाबतीत कृतीमध्ये आणल्या जात आहे. ही पर्यायी विचारसरणी किंवा तत्वज्ञान म्हणजे ब्राम्हणवाद हाेय. हिंदुवादाच्या नावावर ब्राम्हणवादाचाच पुरस्कार करुन ताे वेगवेगळ्या मार्गाने 2014 पासून कृतीत आणला जात आहे. हे समजणे महत्वाचे आहे की, ब्राम्हणवादाचे स्वतंत्र असे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक तत्वज्ञान किंवा विचारसरणी आहे. ब्राम्हणवादाची राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विचारसरणी ही भारतीय घटनेच्या तत्वज्ञानाच्या परस्परविराेधी आहे.
घटना ही सत्याचा आग्रह धरते. सत्य ही सद्सद विवेक बुद्धी व अनुभवाला आधार मानते. परंतु ब्राम्हणवाद हा वेदांमध्ये जे सांगितले आहे त्यालाच सत्य असे मानताे. ते न बदलणारे व निरंतर आहे. त्याविषयी प्रश्न व शंका घेण्याचे स्वातंत्र्य नाही. घटना धर्मनिरपेक्ष ह्या तत्वाचा पुरस्कार करते. ह्याउलट ब्राम्हणवाद ब्राम्हणवादी धर्माच्या आधारावर राज्य चालावे हा आग्रह करते. लाेकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीव्दारे सरकारचा कारभार चालवा असा आग्रह घटना करते. परंतु ब्राम्हणवाद दैवी शासनाचा (Divine Governance) पुरस्कार करताे. घटनेनुसार जनता ही सार्वभाै आहे. तर ब्राम्हणवादामध्ये एक विशिष्ठ जात/ गटांना महत्व देण्यात येते. वैश्य, शुद्र व अस्पृश्यांचा त्यामध्ये फारसा सहभाग हाेत नाही. त्याचप्रमाणे घटना ही जनतेच्या कल्याणाकरिता, समाजवादी अर्थव्यवस्थेचा आग्रह करते. ह्याउलट ब्राम्हणवाद खाजगी अर्थव्यवस्थेवर भर देताे. थाेडक्यात सांगायचे म्हणजे ही धर्मनिरपेक्ष, लाेकशाही, समाजवादी व सार्वभाै ह्या तत्वांवर राज्याचे शासन चालावे हे घटना निर्देशित करते. ह्याउलट ब्राम्हणवाद एका धर्माच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करताे. खाजगी अर्थव्यवस्था व एका विशिष्ठ जातीच्या स्वामित्वाला प्राधान्य देताे. हा विराेधाभास उद्दिष्टामध्ये सुद्धा आढळताे. घटना ही राज्यावर, न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता व राष्ट्रीय एकता जाेपासण्यावर भर देते. ह्या विरुद्ध ब्राम्हणवाद असमानता, बंधन, जातीय ध्रुवीकरण, जाती- जातीमधील संघर्ष व कलह, समाज विराेधी तत्व व मूल्य या वर आधारित जाती व्यवस्थेचा पुरस्कार करते. ह्या मुक्ती विमर्शच्या अंकामध्ये राज्यघटना व ब्राम्हणवाद ह्यांच्यामधील परस्परविराेधी विचारसरणीची चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेला सध्याची स्थिती समजून घेण्यास मदत हाेईल. त्याच बराेबर निवडणुकीमध्ये याेग्य ताे निर्णय घेण्यास मदत हाेईल ही आशा आहे.

-डॉ.सुखदेव थोरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *