Menu

आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणा-या सत्तेमध्येआपण भागीदार झालेच पाहिजेडाॅ. बाबासाहेब आंबेडकर 4 ऑक्टाेबर 1945

ऑल इंडिया शेड्युल्ड कास्टसब फेडरेशनच्या वर्किग कमिटीसमाेर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भाषण
मी तुम्हाला वारंवार सांगत आलाे आहे की, आपल्याला राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय आपला सामाजिक व धार्मिक उद्धार हाेणे अशक्य आहे. आपणास समता आणि स्वातंत्र्य मिळवावयाचे असेल, आपणास इज्जतीने जगावयाचे असेल, आपली प्रगती करून
घ्यावयाची असेल तर या देशाला मिळणा-या सत्तेमध्ये आपण भागिदार झालेच पाहिजे. राजकीय सत्ता हे एक प्रभावी शस्त्र आहे. या शस्त्रास आपण देवाप्रमाणे मानले पाहिजे. आपण या शस्त्राची पूजा करावयास पाहिजे, म्हणजे या शस्त्राचा उपयाेग आपणास
आपल्या शत्रूवर करता येईल. हे शस्त्र मिळविणे आगामी निवडणुकीवर अवलंबून आहे. म्हणून भावी निवडणूक म्हणजे आपल्या जीवन मरणाचा संग्राम आहे. या निवडणुकीवर आपल्या जीवनाचा आणि मरणाचा प्रश्न अवलंबून आहे. या जीवन मरणाच्या दारूण संग्रामात आपण विजयी-यशस्वी झालेच पाहिजे. हा लढा जिंकण्यासाठी आपण जय्यत
तयारी केली पाहिजे. या जय्यत तयारीस आपण आतापासूनच लागले पाहिजे.
सध्या हिंदुस्थानचा राज्यकारभार पाहण्यासाठी एकंदर 15 मंत्री आहेत. मीही त्या 15 पैकी एक आहे. हे आपणाला माहीत आहेना ? मी व्हाईसराॅयच्या कार्यकारी मंडळामध्ये फक्त दाेनच वर्षे आहे. परंतु या दाेन वर्षात मी आपणासाठी काय केले ? अस्पृश्य समाजाच्या शिक्षणाची जबाबदारी जी कधीही आपल्यावर घेतली नव्हती ती मध्यवर्ती सरकारने घेतली.
बनारस हिंदू युनिव्हर्सिटी बांधण्यासाठी हिंदुस्थान सरकारने 20 लाख रुपये दिले. आता देखील त्या युनिव्हर्सिटीचे जवळ जवळ 41 हजार रुपयाचे बील सरकारजवळ येऊन पडले आहे. अलिगड युनिव्हर्सिटी बांधण्यासाठी मुसलमानांना 20 लाख रुपये देण्यात आले हाेते आणि प्रत्येक वर्षी 3 लाख रुपये अलिगड युनिव्हर्सिटीसाठी मध्यवर्ती सरकार देत असते.
अस्पृश्य समाजाच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे याची कल्पना सरकारला स्वप्नात देखील झाली नाही. मी गेल्यानंतर अस्पृश्य समाजाच्या शिक्षणासाठी 3 लाख रुपये मंजूर करून घेतले. या तीन लाख रुपयांमधून प्रत्येक वर्षी 300 विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल. यावेळी 30 विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणार आहेत. त्याचप्रम
ाणे दरवर्षाला 15 विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जावू शकतील. आपल्यापैकी असा काेणी विलायतेला गेला आहे काय ? साहेबाचा बुटलेर म्हणून काेणी कदाचित गेला असेल. यावेळी जाणा-या 30 विद्यार्थ्यांमध्ये एक भंगी, एक मांग आणि किती तरी
चांभार आहेत. मला हेच सांगावयाचे आहे की, या याेजनेचा ायदा अस्पृश्यांतील प्रत्येक जातीला करून घेता येईल. प्राॅव्हीन्शियल सव्हिसेसमध्ये आणि सेन्ट्रल सर्व्हिसेसमध्ये 25 टक्के मुसलमानांसाठी जागा राखून ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे खिश्चन, शिख व अँग्लाे इंडियन यांच्यासाठी ठराविक नाेक-याचे प्रमाण राखून ठेवण्यात आले आहे. परंतु अस्पृश्य समाजाकडे काेणी लक्ष दिले आहे का ? आपल्यासाठी काही साेय करण्यात आली हाेती काय ? आपणाला एक तुकडा देखील दिला गेला नव्हता. मी मात्र तशी साेय करून घेतली आहे. अस्पृश्य समाजासाठी शेकडा आठ पूर्णांक एक तृतीआंश इतके प्रमाण नाेक-
यांमध्ये राखून ठेवले आहे. मी गेल्यापासून आपले पुष्कळ लाेक माेठ्या हुद्यावर चढलेल आहेत. आपल्यापैकी एक डेप्युटी सेक्रेटरी टू दी गव्हर्नमेन्ट ऑफ इंडिया आहे. दुसरा आहेत. आहेत. एक अन्डर सेक्रेटरी आहे. तीन एक्झीक्युटिव्ह इंजिनियर सिमल्याला माझ्या डिपार्टमेन्टचा एक भाग आहे तेथे एकंदर 28 क्लार्क त्यापैकी 18 भंगी आहेत.
राजकीय सत्तेच्या जाेरावर मनुष्य काय करू शकताे याचे हे एक चांगले उदाहरण आहे. मी हे माझा बडेजाव अगर गाैरव करण्यासाठी सांगत नाही. तर आपल्या हाती राजकीय सत्ता आली तर आपण काय करू शकू हे दाखविण्यासाठीच मी हे सांगत आहे. माझ्या जाेडीला आणखी एखादा आपल्यापैकी मंत्री असता तर आम्ही दाेघांनी पुष्कळच केले
असते. मी जर प्रत्येक डिपार्टमेन्टमध्ये फक्त पाच पाच वर्षे राहिलाे तर आपल्या लाेकांचे पुष्कळ कल्याण करता येईल. राजकीय सत्तेशिवाय आपणास काही करता येणार नाही म्हणून आपण राजकीय सत्तेसाठी झगडले पाहिजे. झेश्रळींळली ीर्हेीश्रव लश ींहश श्रळषशलश्रेेव ेष ींहश डलहशर्वीश्रशव उरीींशी. आपला जाे नाश झाला आहे. आपण आज हजाराे वर्षे खितपत पडलाे आहाे त्याचे कारण आपणास राजकीय सत्ता नव्हती. ही सत्ता आपण मिळविली पाहिजे. राजकीय सत्ता ही एक अजब शक्ती आहे, तिचा उपयाेग आपण आपल्या शत्रुवर केला पाहिजे. निवडणुकीसाठी एक पार्लमेंटरी बाेर्ड स्थापण्यात आला आहे. या पार्लमेंटरी बाेर्डावर पाच माणसे राहतील. त्यांनी उमेदवार निवडावयाचे आहेत. त्या बाेर्डाला काही नियम घालून दिले आहेत. त्या नियमाप्रमाणे निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यात येतील. आपण अशाच उमेदवारांना निवडून दिले पाहिजे. ज्याला वाटत असेल की, असेंब्लीमध्ये ताे एकटाच वाटेल ते करू शकेल, तर ताे त्याचा मुर्खपणा आहे. जे काही करू शकेल तर
ताे पक्षच करू शकेल. गेल्यावेळी काँग्रेसला \क्त स्वतंत्र मजूर पक्षाचे भय हाेते. कारण त्यांना माहित हाेते की, हजाराे रुपये जरी दिले तरी आपला सभासद ते घेणार नाही. पार्लमेंटरी बाेर्ड जे काही करील आणि जी माणसे निवडली जातील त्याच माणसाला आपण निवडले पाहिजे. तुम्ही सर्वांनी शपथ घेतली पाहिजे की, आपण ही निवडणूक जिंकूच
म्हणून,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *