Menu

शैक्षणिक अभ्यासक्रम (२०२०) वरील वैदिक धर्माचा प्रभाव

किशोर खांडेकर

शैक्षणिक अभ्यासक्रम (२०२०) या धोरणातून शालेय व उच्छ शिक्षणात महत्वपूर्ण बदल करण्यात आले. यापैकी उच्च शिक्षणाच्या संदर्भात यूजीसीने कला व विज्ञान व वाणिज्य शाखेतील पदवीपूर्व विषयासाठी २० ऑगस्ट २०२५ रोजी Learning outcomes based curriculum Framework 2025 (LOCF) प्रकाशित केले आहे. ज्यामध्ये सामाजिक शास्त्रातील अर्थशास्त्र, राज्यशास्त्र मानवशास्त्र, वाणिज्य, भूगोल, गृहशास्त्र, शारीरिक शिक्षण तसेच विज्ञान शाखेतील गणित, आणि रसायनशास्त्र या विषयाचा मसुदा लर्निंग आउटकम बेस्ड करिकुलम फ्रेमवर्क (LOCF) विकसित केले आहे. प्रस्तुत लेखातून विज्ञान शाखेतील गणित व रसायनशास्त्र या विषयात समाविष्ट ब्राह्मणीमूल्य प्रभावित अभ्यासक्रमाचे विवेचन करण्यात आले आहे.

प्रस्तुत अभ्यासक्रमातून गणित विषयासाठी विद्यार्थ्यांना नारद पुराणातील भूमितीची उदाहरणे, पंचांग वापरून आकडेमोड करून शोधले जाणारे मुहूर्त, तसेच भारतीय वेळेसाठीची एकके शिकवण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम आखण्यात आला. त्याशिवाय भारतीय बीजगणिताचा इतिहास आणि उत्क्रांती, बहुपदी भागाकारासाठी पावर्य योजना, सूत्र अशा जुन्या सूत्रांचा वापरही शिकवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

वैदिक सूत्रांचा वापर करून गणित व बीजगणित शिकण्यासाठी शुल्बसूत्रांमधील भूमिती संदर्भ २, अध्याय II: रुंदीच्या (तिर्यक) चौकोनाचा प्रमेय, बौधायन आणि कात्यायन), यांचे प्रमेय, शुल्बसूत्रांमध्ये भूमितीय आकृत्यांची रचना दिली आहे. ब्रह्मगुप्त सूत्रांचा वापर करून ‘वतुर्लाक-ार चतुर्भुजाच्या क्षेत्रफळासाठी कर्णांची लांबी शोधणे तसेच भास्कर, नारायण पंडित आणि ज्येष्ठदेव यांचे वतुर्जाकार चतुर्भुजावरील निष्कर्ष समविष्ट आहेत

आर्यभट्ट ब्रह्मगुप्त आणि भास्कर यांचे ‘क्षेत्रफळ व घनफळ (चतुष्फल, खंट, शंकू, पिरॅमिड, गोलक) यावरील समस्यांचा अभ्यास, आर्यभट्टाच्या सूत्राची नीलकंठाने केलेली व्युत्पत्ती, भारती कृष्ण तीर्थ यांनी विकसित केलेल्या पद्धती, ‘नारायण पंडित यांचे ‘बारसंकलित’ सूत्र, श्रेणींच्या बेरजांशी संबंधित सूत्रांमध्ये श्रीधर, महावीर, ठक्कर फेरु व नारायण पंडित यांची सूत्रांचा मसुदा समाविष्ट आहे. भद्रगणितात जादू चे चौकोन (Magic Squares) तयार करण्याच्या पद्धतीम ध्ये पॅनडायगोनल जादूचे चौकोन, वराहमिहिरांचे सर्वतोभद्र, नारायण पंडितांच्या अल्पश्रुति व तुरगगती पद्धती. ‘माधव यांची प्रतिलोम स्पर्शज्या (Inverse Tangent) यासाठीची अनंत श्रेणी (आज ‘ग्रेगरी लाइब्निझ श्रेणी’ म्हटले जाते). इत्यादी विषय अंतर्भूत आहे.

वजाबाकीसाठी- परम मित्र पद्धत, कापरीकार स्थिरांकांचा, संख्यांचे भागाकार करण्यासठी ध्वजांक, निखिलम आणि परावर्त्य सूत्र पद्धती, परा व अपरा विद्या यांची संकल्पना, देव व आत्मा यांची संकल्पना प्रस्तुत आहे.

प्राचीन भारतातील १४ विद्याशाखामध्ये पुराण, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र, सहा वेदांग (शिक्षा, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष, कल्प), वेदांग व उपवेदांची ओळख, चार्वाक, जैन व बौद्ध दर्शन, तर्कशास्त्र (लॉजिक) प्रमाण, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान. यांचा समावेश आहे. भारतीय गणिताच्या अभ्यासात प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ । मेधातिथि, बौधायन, आपस्तंब, मानव, कात्यायन, उमास्वाती, भद्रबाहू, लागध, आर्यभट I, भास्कर I. वराहमिहीर, ब्रह्मगुप्त आणि आर्यभट यांचा अभ्यास तर प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ II: श्रीधर, महावीर, भास्कर II, नारायण पंडित, माधव, नीलकंठ, परमेश्वर, ज्येष्ठदेव, रामानुजन, स्वामी भारती कृष्णतीर्थ आणि कापरेकर इत्यादी विषयांचा समावेश आहे.

कालगणना या अभ्यासक्रमात भारतीय तत्त्वज्ञान व साहित्यातील काळ (वेळ) संकल्पना, सूर्यसिद्धांत, भृगुसंहिता, आर्यभटीय, पंचसिद्धांतिक च सिद्धांत शिरोमणी मधील कालगणना. भौगोलिक विभागांनुसार व चार युगांमध्ये काळाचे विभाजन, युग व कल्प यांमधील फरक. घटी / विघटी यांमध्ये वेळेची मोजणी. बयचक्र ५२ व ६० वर्षांची परंपरा. युगमान चतुर्युग, महायुग, मन्वंतर, कल्प, ब्रह्मवर्ष, विष्णुवर्ष, शिववर्ष, दैवी वर्ष या संकल्पना.

रसायनशास्त्र या विषयांतर्गत आयुर्वेदिक ग्रंथांचा आढावा;

आयुर्वेदाची मूलभूत तत्त्वेः पंचमहाभूत, त्रिदोष आणि आयुर्वे दातील निदान व उपचार पद्धतीः अस्थानपरिक्षा आणि पंचकर्म, आसव, अर्क आणि अरिष्ट यांची तयारी, द्रव्यांच्या गुण-वीर्य विपाक इत्यादींचे विश्लेषण, सिद्ध ग्रंथांचा आढावा; सिद्धवैद्यकाची मूलभूत तत्त्वे. सिद्ध पद्धतीतील निदान व उपचार, सिद्ध पद्धतीची वैशिष्ट्ये आणि आयुर्वेदाशी असलेली समानता. सिद्ध वैद्यकातील औषधांचे वर्गीकरण, प्राचीन भारतातील धातुकर्म शिकण्यासाठी महर्षी कणाद (प्राचीन ग्रंथ व हस्तलिखिते), नागार्जुन (रस रत्नाकर, कक्षपुटतंत्र, आरोग्यमंजरी, योगसार, योगाष्टक), वाग्भट (रस रत्नसंचय),-गोविंदाचार्य रसार्ण, यशोधर रसप्रकाश सुधाकर, रामचंद्र (रसेंद्र चिंतामण) सोमदेव (रसेंद्र चूडामणी) इत्यादी अभ्यास अंतर्भूत आहे. पारंपरिक आणि आधुनिक वैद्यकशास्त्रातील धातूंचा उपयोग शिकण्यासाठी पारंपरिक भारतीय वैद्यकशास्त्रात सुवर्णभस्म (Gold Ash) आणि इतर धातूंच्या भस्मांचा उपयोग समाविष्ट आहे.

वरीलप्रमाणे अभ्यासक्रमातून गणित व स्मायनशास्त्र या विषयांवरील अभ्यासक्रम हा वैदिक धर्माचा मूल्य प्रभावित असल्याचे निदर्शनास येते. या प्रकारच्या अभ्यासक्रमातून गणित व रसायनशास्त्राचे भवितव्य धोक्यात येण्याची संभावना नाकारता येत नाही. किंबहुना तज्ञांकडून सुद्धा याप्रकारची भीती व्यक्त केली जात आहे. उदा. वैदिक गणित, भारतीय बीजगणित, कुंडलीच्या या माध्यमातून आकडेमोड, प्राचीन भारतीय खगोलशास्त्राच्या कल्पना अशा पुराणातील गोष्टींनी भरलेला पदवीपूर्व गणित अभ्यासक्रमाचा मसुदा गणिताच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याची परखड भूमिका देशभरा-तून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *