Menu

वेद स्मृतीप्रणीत समाजशास्त्रीय अभ्यासक्रम

डॉ विद्या चंद्रा

भारतीय विद्यापीठांचा उच्च शिक्षणाचा टप्पा म्हणजेच पदवी अभ्यासक्रम मोठ्या बदलातून जात आहे. संपूर्ण देशभरात २०२३-२४ पासून नवीन शैक्षणिक धोरण (NEP २०२०) लागू करण्यात आले आहे. ‘शिकण्याच्या निष्कर्षांवर आधारित’, ‘उद्दिष्टपूर्ती करणारा’, ‘आंतरशाखीय महत्व’, ‘विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेला अभ्यासक्रम अशा गोंडस जाहिरातीद्वारे प्रस्तुत अभ्यासक्रमाचा समावेश पदवी अभ्यासक्रमात करण्यात आला. ज्याचे पॅकेजिंग आकर्षकपणे प्रस्तुत केले जात आहे. अलीकडेच नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत यूजीसीने कला व विज्ञान व वाणिज्य शाखेतील पदवीपूर्व विषयासाठी २० ऑगस्ट २०२५ रोजी Learning outcomes based curriculum Framework 2025 (LOCF) प्रकाशित केले आहे. आयोगाने आतापर्यंत नऊ विषयांसाठी मानवशास्त्र, रसायनशास्त्र, वाणिज्य, अर्थशास्त्र, भूगोल, गृहशास्त्र, गणित, शारीरिक शिक्षण आणि राज्यशास्त्र मसुदा लर्निंग आउटकम बेस्ड करिकुलम फ्रेमवर्क (LOCF) विकसित केले आहे. ‘मसुदा LOCF हा कार्यक्रम रचना व अभ्यासक्रम विकासामध्ये लवचिकता आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी आदर्श अभ्यासक्रम म्हणून काम करेल,’ असा विश्वास युजीसी कडून व्यक्त केला जात आहे. सदर अभ्यासक्रमातील बदल हे वेद स्मृतीप्रणीत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे प्रस्तुत लेखातून ज्या विषयांमध्ये वेद स्मृतीप्रणीत अभ्यासक्रम समाविष्ट आहे अशाच विषयातील मुख्य घटकांचा आढावा घेण्यात आला. लेखाची मांडणी दोन भागात केली असून पहिला भाग हा अभ्यासक्रमातील बदल दर्शवितो तर दुसरा भाग प्रस्तुत अभ्यासक्रमाचे विश्लेषण करतो.

सामाजिकशास्त्रातील राज्यशास्त्रासाठी यूजीसीच्या मसुदा LOCF मध्ये २० चार क्रेडिटचे शाखाविशिष्ट मूलभूत अभ्यासक्रम (DSC) प्रस्तावित करण्यात आले आहेत. याम ध्ये ‘भारतातील राजकीय विचारसरणीची परंपरा’ या अभ्यास क्रमाचाही समावेश आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वैदिक परंपरा, जैन व बौद्ध साहित्य, उपनिषदे, रामायण, महाभारत आणि तिरुकुरळातील राजकीय विचार तसेच भास, कालिदास आणि कल्हण यांच्या लिखाणांचा परिचय करून दिला गेला. इतर DSC अभ्यासक्रमांमध्ये भारताचे स्वातंत्र्य चळवळ, संबिधान, सार्वजनिक धोरण (Public Policy) आणि पंचायतराज प्रणाली बांसारख्या विषयांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वेदांतील राजधर्म समजावून घेता येईल, मनुस्मृती आणि शुक्रनीतीमधील त्याचे विवेचन पाहता येईल आणि रामायणातील अयोध्याकांड, महाभारतातील शांतिपर्व तसेच कौटिल्याच्या अर्थशास्त्र यांसारख्या ग्रंथांतील त्याचे स्वरूप समजून घेता मेईल, असे सांगण्यात आले.

सहा स्वतंत्र अभ्यासक्रम हा विविध भारतीय नेते व समाजसुधारकांवर आधारित असून, एक विशेष अभ्यासक्रम भारतातील महिला स्वातंत्र्यसैनिकांवर आहे, ज्यामध्ये मध्ययुगीन भारतीय इतिहासातील महिला बोड्या आणि महिला शासकांच्या योगदानाचे विश्लेषण करण्यात आले. आंबेडकरांवरील अभ्यासक्रम त्यांच्या विचारांचा केवळ जातिव्यवस्थेपुरता मर्यादित न राहता अर्थव्यवस्था, वर्ग, लिंग, संस्कृती, राजकारण, लोकशाही, कायदा व घटनात्म कता यांपर्यंत विस्तार करतो आणि त्यांचे समकालीन सम ाजातील महत्त्व अधोरेखित करतो. गांधींवरील अभ्यासक्रम त्यांच्या जीवन, तत्त्वज्ञानाची ओळख करून देतो, विशेषतः अहिंसा, न्याय आणि सामाजिक-राजकीय सहभाग यांबर भर देतो. सावरकरांवरील अभ्यासक्रम त्यांच्या ‘क्रांतिकारी प्रवासाचा’, सामाजिक-राजकीय विचारांचा तसेच स्वातंत्र्यलढ्यातील आणि हिंदुत्वातील भूमिकेचा अभ्यास करतो, ज्यायोगे राष्ट्रवाद व सामाजिक सुधारणांशी चिकित्सक संवाद साधता येतो. उपाध्यायांवरील अभ्यासक्रम त्यांच्या ‘एकात्म मानवतावाद’ या तत्त्वज्ञानाचा व भारताच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक विचारांना दिलेल्या योगदानाचा अभ्यास करतो.

अर्थशास्त्र विषयातील भाग एक मध्ये प्राचीन भारतातील आर्थिक विचार या घटकांत धर्मपरंपरेतील संपत्ती व समृद्धीविषयक भारतीय संकल्पना; अर्थव्यवस्थेत राजाची भूमिका समाविष्ट आहे. भारतीय परंपरेतील कल्याण या घटकांत पुरुषार्थ हा विषय सर्वांगीण जीवनध्येयांचा आराखडा म्हणून सर्वांगीण जीवनध्येयांचा आराखडा म्हणून उपनिषद, शुक्रनीती, बृहस्पति संहिता यांतील कल्याण संकल्पना, प्रस्तुत करण्यात आली. स्थानिक आर्थिक नीतिशास्तत्रामध्ये धर्मासोबत अर्थ, सुमंगलम विकास आहे. भाग दोन मध्ये आर्थिक प्रशासनातील नीतिशास्त्र अर्थाचे नैतिक आधार; सार्वजनिक कल्याण हे कर्तव्य (प्रजा सुखं सुखं राज्यम्); आर्थिक निर्णयांमध्ये वास्तववाद आणि धर्म यांचा समतोल, कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील कर, शुल्क आणि देशांतर्गत व परदेशी व्यापाराचे नियमन तसेच पर्यावरणीय अर्थशास्त्राची पायाभूत तत्त्वे आणि स्थानिक पर्यावरणीय प्रज्ञा या घटकात वैदिक चिंतनातील पर्यावरणीय सामंजस्य इत्यादी विषय समाविष्ट आहेत. गृहशास्त्राच्या अभ्यासक्रमात नाविन्यपूर्ण ECCE (Early Childhood Care and Education) मॉडेल्स या घटकांमध्ये नूतन बाल शिक्षण संघ, भारत, दक्षिणामूर्ति बाल मंदिर, भारत, ग्राम बाल शिक्षण केंद्र, लोक जुबीश कार्यक्रम, मिरांबिका, ऋषी व्हॅली, यांचा समावेश आहे. आयुष्याच्या विकासातील प्राचीन प्रज्ञा अंतर्गत प्रायोगिक उपक्रम, आत्मचिंतनात्मक पद्धती आणि आंतरसांस्कृतिक विश्लेषण यांचा समावेश असून, विशेषतः भारतीय परंपरांमधून घेतलेल्या मानवी विकासावरील शाश्वत विचारांचे आत्मसातीकरणासाठी धर्म, कर्म आणि मोक्ष यांचे तत्त्व प्रत्यक्ष जीवनात लागू करणे, व योग, प्राणायाम, ध्यान आणि उपनिषदांचे तत्त्व प्रत्यक्ष जीवनात वापरणे ही उद्दिष्टे स्वीकारण्यात आली आहे ज्यामध्ये गुरुकुल शास्त्र, व्यावसायिक व शैक्षणिक कौशल्ये आणि मूल्ये, योगमार्ग: ज्ञानयोग आत्मपरीक्षण, तर्क व अनुभूतीद्वारे अध्यात्मिक अंतर्दृष्टी, कर्मयोग परिणामाशी आसक्ती न ठेवता निःस्वार्थ कृती (कर्म कृती, योग एकत्व/शिस्त), राजयोग ध्यान, मनः संयम व आत्मनियंत्रणाचा योग, भक्तियोग ईश्वरभक्ती, प्रेम व दैवी शक्तीपुढे शरणागतीचा योग हा अभ्यासक्रम आहे. पुरुषार्थ संकल्पनेसाठी धर्म नीती, कर्तव्य, नैतिक जीवन अर्थ भौतिक समृद्धी, यश, काम आनंद, प्रेम, भावनिक परिपूर्णता, मोक्ष आत्मसाक्षात्कार, पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती संन्यासाश्रम या संकल्पनेत त्यागाचा टप्पा व आध्यात्मिक उत्क्रांती सिद्धांत घेण्यात आला.

मानवशास्त्राच्या मुख्य घटकांमध्ये, भारतीय तत्त्वज्ञान व मानवशास्त्र यांचा परस्परसंबंध दर्शविण्यासाठी सांख्य, बेदांत, बौद्ध अशा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा समावेश आहे.

मानवशास्त्र व भारतीय ज्ञानप्रणाली प्राचीन भारतीय ग्रंथ बेद व पुराणे मानवशास्त्रीय ज्ञानाचे स्रोत म्हणून दिले आहेत. चौथ्या भागात पाणिनिच्या अष्ठध्यायी, प्राकृत व इतर स्थानिक भाषिक परंपरांचा अभ्यास मानवशास्त्र व भारतीय ज्ञानप्रणाली (IKS): जमानी पद्धतीचे विश्लेषण, अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन ग्रंथांतील कृषी पद्धती, तसेच वृक्षार्युवेद सारख्या स्थानिक शेती तंत्रांचा अभ्यास समाविष्ट आहे. मानवशास्त्र व भारतीय ज्ञानप्रणाली (IKS): मध्ये पवित्र वने व पारंपरिक पर्यावरण नैतिकता भारतीय आदिवासी व वैदिक परंपरांतील स्थानिक पर्यावरणीय संवर्धन पंचमहाभूत: निसर्ग मानव संबंधाचे भारतीय आकलन व वसुधैव कुटुंबकम हा अभ्यास समाविष्ट आहे. तसेच मानवाचा उगम, उत्क्रांती व भारतीय ज्ञानप्रणाली (IKS), दशावतार सिद्धांत व उत्क्रांती, उत्क्रांती व उपनिषदांतील ब्रह्म संकल्पना यांतील साम्य आहे. भारतीय समाजातील विविधतेचे आकलन समजण्यासाठी वर्ण, जाती, जमात, आश्रम व त्यांचा भारतीय परंपरा व तत्त्वज्ञानाशी संबंध, वसुधैव कुटुंबकम व आश्रम संकल्पनेचे परिणाम, पुरुषार्थ, संस्कार, जजमानी पद्धती व सहअस्तित्व घेण्यात आले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरामध्ये षड्दर्शन, बौद्ध धर्म, जैन धर्म व इस्लाम आणि त्यांचा भारतीय समाजावर प्रभाव समविष्ट आहे. भारतीय समाज व संस्कृती समजून घेण्यासाठी प्रभुत्वशाली जात (Dominant Caste), जमात-जाती सातत्य (Tribe-Caste Continuum), निसर्ग-मानव-आध्यात्मिक गुंफण (Nature-Man-Sirit Complex). पवित्र संकुल (Sacred Complex) या मूलभूत संकल्पना समाविष्ट आहे.

भारतीय मानवशास्त्रातील योगदान अभ्यासण्यासाठी एस.सी. रॉय, बी.एस. गुहा, डी. एन. मजुमदार, इरावती कर्वे, एस. एस. सरकार, एस. आर. के. चोप्रा, एम.एन. श्रीनिवास, एल. पी. विद्याभूषण, एस.सी. दुबे, पी. सी. विश्वास, गोपाळा सरणा, बी.एम. दास, आर.पी. श्रीवास, आय.पी. सिंह. एन. के. बोस, बी.एन. सरस्वती, सूरजित बंद्र सिन्हा यांचा समावेश आहे. पुराणमानवशास्त्र व भारतीय ज्ञानप्रणाली (IKS):, मध्ये मानवाच्या उगमावरील प्राचीन दृष्टिकोन (मनू, प्रजापती), दिला आहे. नृवंशशास्त्रीय छायाचित्रण भागात दृश्य मानवशास्त्र व भारतीय ज्ञानप्रणाली (IKS) करिता पारंपरिक लोककलांचे धार्मिक व सादरीकरणात्मक पैलू रामलीला, यक्षगान इत्यादी विषय समाविष्ट आहे. वाणिज्य अभ्यासक्रमात वित्तीय व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी भारतीय वित्तीय प्रज्ञाया भागात अर्थशास्त्र (कौटिल्य) समावेश आहे. भाग दोन मध्ये नैतिक सिद्धांत आणि आराखडे समजण्यासाठी भारतीय नैतिक तत्त्वज्ञान धर्म, कर्म आणि मोक्ष; वेद, उपनिषदे, भगवद्गीता, पुराणे, रामायण, महाभारत आणि इतर भारतीय ग्रंथांमधील महत्त्वपूर्ण नैतिक शिकवणी समविष्ट आहेत. भारतीय समतावादी अर्थव्यवस्थेची संकल्पना समजून घेण्यासाठी वसुधैव कुटुंबकम, अहं ब्रह्मास्मि तत्व दिले आहे. भारतीय नेतृत्वाचा नमुना अभ्यासण्यासाठी कृष्ण-अर्जुन व प्रभावी नेता म्हणून हनुमानजी इत्यादींचा समावेश आहे.

शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमात प्राचीन भारतातील समग्र विकासाचा भाग म्हणून शारीरिक शिक्षणावरील वैदिक दृष्टिकोन तसेच जीवनातील धर्म, शिस्त व तंदुरुस्तीवरील वैदिक दृष्टिकोन समाविष्ट आहे. वैदिक व महाकाव्य काळ या भागात व्यायाम व खेळ (क्रीडा व व्यायाम) यासंदर्भातील वेदातील उल्लेख तसेच महाभारत व रामायण काळातील शारीरिक कौशल्ये शिकायची आहेत. प्राचीन भारतातील गुरुकुल प्रणाली शिकण्यासाठी निवासस्थानी शिक्षण, समग्र शिक्षण, वैयक्तिक व प्रायोगिक शिक्षण, गुरु-शिष्य परंपरा, आत्मनिर्भरता व साधेपणा, वैदिक ज्ञान, तत्त्वज्ञान व अध्यात्म, शारीरिक प्रशिक्षण, विज्ञान व कला, जीवनकौशल्ये योद्धा व नेत्यांची तयारी करण्यातील शारीरिक प्रशिक्षणाची भूमिका इत्यादी विषय दिले आहे.

योग शिक्षणासाठी अध्यात्म आणि आरोग्यासाठी योगाची उत्पत्ती व विकास, योग क्षेत्रातील पतंजली व गुरु गोरख नाथांचे योगदान हे घटक दिले आहे. मध्यकालीन भारतातील शारीरिक शिक्षणातील शैक्षणिक बदलांमध्ये अध्यात्मिक व समग्र शिक्षणापासून लष्करी व दरबार केंद्रित शारीरिक क्रियाकलापांकडे वळण, भारतातील समग्र विकासासाठी गुरुकुल प्रणालीचा क्षय अंतर्भूत आहे. विद्यार्थ्यांकडून प्रबंधात्मक कार्यासाठी योगाचा ऐतिहासिक विकासः वैदिक उत्पत्तीपासून आधुनिक काळापर्यंत तसेच प्रमुख योग शाळांचा आढावा (ज्ञान, भक्ती, कर्म, राजा व हठ योग) व पतंजलींचे योगसूत्रः पार्श्वभूमी व महत्त्व हे विषय दिले आहे. दुसऱ्या भागात मुख्य तात्त्विक ग्रंथ व तत्त्वे घटकात भगवद्गीताः आत्मसाक्षात्कारासाठी योग मार्ग, योगातील नैतिकतेची भूमि काः यम व नियम, योग तत्त्वज्ञानातील मन, चेतना व अहंकार यांची संकल्पना, कर्म, धर्म व संसार, क्रीडा व्यवस्थापनाची ओळख व भारतीय दृष्टिकोनामध्ये भारतीय व्यवस्थापन तत्त्वज्ञानः अर्थशास्त्र, भगवद्गीता यांसारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांमधून जीवन व्यवस्थापनासाठी घेतलेल्या शिकवणीचा समावेश आहे. भूगोल विषयातून ‘एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य’ ही संकल्पना व ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भारतीय संकल्पना समाविष्ट आहे.

एकूणच वरीलप्रमाणे ७ विषयांचा अभ्यासक्रम लक्षात घेता असे दिसते की, हा अभ्यासक्रम आधुनिक प्रगतीशी सुसंगत नसून विशिष्ट धर्माच्या ज्ञान परंपरेला ऐतिहासिक म हत्व देण्याचा हा प्रयत्न आहे. या अभ्यासक्रमातून उच्च शिक्षण संस्था केवळ पदवी प्रदान करणाऱ्या संस्था म्हणून नावरूपास येण्याचा धोका नाकारता येत नाही. प्रस्तुत अभ्यासक्रम एका ठराविक अजेंड्याने प्रेरित असून यामध्ये वेद, पुराण, व म नुस्मृती पुरुस्कृत ठराविक प्रतिमांना, घटनांना व नायकांना महत्व देण्यात आले आहे. यावरून भारतीय संविधानाच्या कलम २८ चे पूर्णपणे उल्लघन करणारा हा अभ्यासक्रम आहे असे निदर्शनास येते.

भारतातील विविध प्रदेश आणि राज्यांमध्ये उच्च शिक्षण संस्थांचा असमान विकास झालेला आहे. उदाहरणार्थ, दिल्ली, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये प्रतिष्ठित संस्थांची संख्या जास्त आहे, तर ईशान्य आणि मध्य भारतातील अनेक राज्ये गुणवत्ता व प्रवेशयोग्यता या बाबतीत मागे आहेत. ही असमानता लक्षात न घेता प्रस्तुत अभ्यासक्रम सर्वच स्तरावर अमलात आणण्याचे धोरण फारसे उपयुक्त नाही. या अभ्यासक्रम बदलातून चांगल्या संधी आणि अधिक वेतनासाठी प्रतिभावान विद्यार्थी व शिक्षक इतर देशांकडे किंवा खासगी क्षेत्राकडे पलायन होण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. यासोबतच भारतातील उच्च शिक्षण संस्थांना पात्र प्राध्यापक सदस्यांच्या मोठ्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. २०२३ पर्यंतच्या स्थितीनुसार, भारतातील ४५ केंद्रीय विद्यापीठांपैकी ३०% हून अधिक अध्यापन पदे रिक्त होती. म्हणजेच उच्च शिक्षण संस्थांमधील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून केवळ अभ्यासक्रम बदलांची भूमिका घेणे उचित नाही. उच्च शिक्षणातील प्रवेशयोग्यता विषम राहिली आहे, त्याचबरोबर वर्तमान सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी, लिंग आणि भौगोलिक स्थितीची लक्षणीय असमानता लक्षात घेता अभ्यासक्रमातील बदल हे कितपत न्याय्य ठरू शकते?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *