-अभिजित कांबळे, मिनिया पोलीस, अमेरिका
१५ ते ३० नोव्हेंबर २०२४ चा ‘मुक्ती विमर्श’ पक्षीकांचा कताच प्रसिद्ध झालेला अंक अतिशय उत्कृष्ट झाला आहे. हा अंक भारतातील महाराष्ट्र राज्याच्या होणा-या निवडणुकीवर मुख्यत: भाष्य करणारा असला तरी, भारतातील संविधान व ब्राह्मणवाद मानणा-या मानसिकतेचा संघर्ष स्पष्ट करणारा आहे. या मौलिक अंकाच्या संपादकीय लेखात प्रा. डॉ. सुखदेव थोरात यांनी आम्हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातच व्यस्त असणा-या नवीन पिढीसमोर अधिकारवाणीने तो उलगडला आहे, यासाठी त्यांचे हार्दिक आभार.
या शिवाय, विविध लेखकांनी लिहीलेले राज्य शासनाचे ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न, रोजगारविहीन आर्थिक विकासाची समस्या, महाराष्ट्रातील शिक्षणामधील विषमतेचा प्रश्न, दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी हे लेखसुद्धा अभ्यासपूर्ण आहेत. या अंकातील ‘लोकभावनेच्या माध्यमाने समाजातील मान्यवरांनी मांडलेली मनोगते या अंकाचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. तसेच घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी विशेषत: अमेरिकेतील प्राध्यापक डॉ. केविन ब्राऊन यांनी भारतातील नागपूर येथील भाषणात व्यक्त केलेले मत वास्तव मांडणारे आहे. अंक सर्वच अंगाने वाचनीय झाला आहे.
-डॉ. राजेंद्र कांबळे, पुणे
विविध मंचांवर विचारप्रवर्तक व्याख्यानां व्यतिरिक्त जनतेला शिक्षित करण्यासाठी डॉ. थोरात यांनी केलेल्या खूप चांगल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे आभार. मी त्यांचे आणि मुक्ती विमर्शच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.