देशभरातील तब्बल ९००हून अधिक गणितज्ञ, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) पत्र पाठवले आहे. हा मसुदा मागे घेतला नाही, तर भविष्यातील पदवीधारक तंत्रज्ञान, उद्योग या क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी असमर्थ ठरतील, असा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे.
गणितासारख्या विषयात असंबद्ध घटकांचा समावेश पदवीपूर्व अभ्यासक्रमात केल्याबद्दल या मसुद्याविरोधात चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बंगळुरू), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई), आयआयटी मुंबई, अशोका विद्यापीठ, शिव नादर विद्यापीठ, कोलकाता येथील आयआयएसईआर आणि इंडियन स्टॅटिस्टिक्स इन्स्टिट्यूट यांसारख्या संस्थांमधील गणिताच्या शिक्षकांनी विरोध दर्शवला आहे.
मनुस्मृती पुढे आज्ञा देते : राजा यांनी वैश्य आणि शूद्रांना त्यांच्या (धर्मशास्त्रात) नेमून दिलेल्या कार्यास भाग पाडावे; कारण जर या दोन वर्गानी आपापली कर्तव्ये टाळली, तर संपूर्ण जगात गोंधळ माजेल. (भूलर, १८८६, श्लोक ४१८: पृ. ३२७)
डॉ. आंबेडकर उद्धृत करतात : ब्राह्मणाला धर्म शिकविणे व उपदेश करणे, क्षत्रियाला संरक्षण च सैनिक व्यवसाय, वैश्याला व्यापार व शेती आणि शूद्राला या तिन्ही वर्णांची सेवा असे कार्य नेमले आहे. जर शूद्राने जाणूनबुजून वेद (हिंदू पवित्र ग्रंथ) ऐकण्याचा किंवा पाठ करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे कान वितळलेल्या शिशे व लाखाने भरावे; जर त्याने वेद उच्चारले, तर त्याची जीभ कापावी; जर त्याने वेद आत्मसात केले असतील, तर त्याचे शरीर तुकडे तुकडे करावे. (भूलर, १८८६)