Menu

महाज्योती इमारतीच्या भूमिपूजनावरून सामाजिक संघटनांचा आक्षेप: धार्मिक ऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्याची मागणी

नागपूर प्रतिनिधी

महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने स्थापन झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) च्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन समारंभात वेदोक्त मंत्रोच्चार वापरल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. यासंदर्भात सामाजिक संघटनांनी राज्याचे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, शैक्षणिक व सामाजिक संस्था स्थापन करण्यामागे शासनाचा मुख्य उद्देश विद्यार्थी व नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद वृद्धिंगत करणे हा असतो. परंतु, महाज्योतीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन वेदोक्त मंत्रोच्चाराने करण्यात आले, जे महात्मा फुले यांच्या अनिष्ट धार्मिक रूढी, परंपरा आणि कर्मकांडाच्या विरोधातील जीवनकार्याला आणि संविधानातील ५१(एच) अनुच्छेदानुसार अपेक्षित असलेल्या विज्ञानवादी दृष्टिकोन, मानवतावाद, संशोधक वृत्ती व चिकित्सक बुद्धी च्या विकासाला तड़ा देणारे आहे.
निवेदन देण्यासाठी, बहुजन संघर्ष समिती, ओबीसी युवा अधिकार मंच, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय मुस्लिम बहुजन परिषद, बाणाई नागपूर, सत्यशोधक समाज, कर्पूरी ठाकूर विचार मंच, शिक्षा बचाव समन्वय समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रिपब्लिकन फेडरेशन, समता सैनिक दल, अनिस आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यामध्ये प्रामुख्याने नागेश चौधरी, उमेश कोर्राम, डॉ. संजय शेंडे, स्वाती रोडे, अनिता ठेंगरे, नंदा देशमुख, दिलीप खोडके, प्रमोद वैद्य, प्रताप पटले, अजय यावलकर, प्रा. जावेद शेख, प्रदीप नगरारे, बाबा विडकर, नागपुर, प्रदीप शेडे, जया देशमुख, नब्बु शेख, महेंद्र गांजरे, नरेश खडसे, रमेश विजेकर, जगजीत सिंग, रामभाऊ डोंगरे, त्रिलोक हजारे, सुधांशू मोहोड, राम काळे, पियुष आकरे, शुभम तिखट, सुहास अंबादे, होमेश भुजाडे, किशोर खांडेकर, सुनील सारीपुत, सुशील मेश्राम, मिलिंद पखाले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *