महागाई, बेराेजगारी, महिला अत्याचार व धार्मिक अंधश्रद्धा या प्रश्नांना वाचा
फेडण्यासाठी दिनांक 11/ 03/2024 – राष्ट्रीय महिला परिषदे चे आयाेजन करण्यात
आले. या प्रसंगी अनेक मान्यवर महिला सदस्यांनी विचार व्यक्त केले. वर्तमान सरकारने
पंचवार्षिक याेजना बंद केली आणि आता संविधानही बदलतील असा इशारा केंद्रीय

नियाेजन आयाेगाच्या माजी सदस्य डाॅ. साहिदा अहमद यांनी दिला. देशात मागील काही
दिवसांपासून धर्माधर्मात प्रचंड द्वेष आणि महिलावर हाेणा-या धार्मिक अत्याचाराबद्दल
खेद व्यक्त केला. या देशात माेठ्या प्रमाणावर विशेषतः मुस्लिमांच्या विराेधात द्वेष
पसरविला जात आहे. अशी मानसिकता देश हितासाठी अत्यंत घातक आहे. असे मत
गुजरातच्या सामाजिक कार्यकर्त्या डाॅ. शिबा जाॅर्ज यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध लेखिका
डाॅ. प्रतिमा परदेशी यांनी महिलांनी राजकारणाबाबत उघड भूमिका घ्यावी आणि या
निवडणुकीत लाेकशाहीच्या बाजूने असलेल्यांना मतदान करावे असे मत व्यक्त केले. तसेच
नवीन शैक्षणिक धाेरणातून नवीन मनुवाद प्रसारित केला जाणार असल्याचे सांगितले.
या परिषदेच्या अध्यक्षा मा. डाॅ.विमल थाेरात यांनी देशात हुकुमशाही आणू इच्छिणा-या
सत्तेला महिलाच धडा शिकविणार असे सूचक वक्तव्य केले.
संकलक
-विद्या चंद्रा