सं | पा | द | की | य
मुक्ती विमर्श’ चा हा अंक दलित व वंचीत वर्गाच्या राजकीय पक्षांच्या राजकारणाशी
संबंधित असलेल्या मुद्द्यावर चर्चा करताे. सर्वप्रथम डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक, राजकीय,
सामाजिक तत्वज्ञान व धाेरणे ह्यांची चर्चा करताे. दुसरे म्हणजे, 1936 मध्ये स्थापन केलेल्या स्वतंत्र मजुर पक्ष; शेडूल
काष्ट फेडरेशन, 1942; आणि 1957 मध्ये स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी नी स्वीकारलेली विचारसरणी व धाेरणे
ह्याचे विश्लेषण व चर्चा करताे. शिवाय त्यासंदर्भात दलित व वंचित वर्गाच्या राजकीय पक्षांनी काेणती विचारसरणी
किंवा तत्वज्ञान व धाेरण स्विकारावे हेही सुचवताे. शेवटी सध्या चर्चेत असलेल्या निवडणूक युतीच्या मुद्यावर डाॅ.
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मांडणी करताे. सुखदेव थाेरातांच्या पहिल्या लेखात 1920 आणि
1930 च्या दशकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात उपलब्ध असलेल्या चार तत्वज्ञानांवर (Ideologies)
चर्चा करण्यात आली आहे. त्यात भांडवलशाही साम्यवाद, लाेकशाही समाजवाद आणि सामाजिक लाेकशाही (Social
Democracy) यांवर चर्चा केली आहे. त्यानंतर आय.एल.पी.. (Independent Labour Party) 1936,
एस.सी.ए. (Scheduled Castes Federation) 1942 आणि आर.पी.आय. (Republican Party of India) 1957 ह्या बाबासाहेबांनी स्थापना केलेल्या राजकीय पक्षाची विचारधारा किंवा तत्वज्ञान आणि धाेरण ह्यावर चर्चा केली आहे. आर.पी.आय.
च्या माध्यमातून दलित व वंचीत वर्गाच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांनी सुचविलेल्या तत्वज्ञानात लाेकशाही
समाजवाद, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यावर आधारित आर्थिक, राजकीय व सामाजिक व्यवस्थेचा पुरस्कार केला.
किशाेर खांडेकर आणि डाॅ. विद्या चंद्र ह्यांच्या लेखात आय.एल.पी. 1936, शे.का.े. 1942 व आर.
पी.आय. 1957 ह्या तिन्ही राजकीय पक्षाने स्विकारलेली विचारसरणी व धाेरण ह्यांच्या आढावा घेतला आहे.
लेखकाने मत व्यक्त केले कि, 1957 मध्ये आर. पी. आय. च्या जाहीरनाम्यात जे धाेरण व कार्यक्रम मांडले ते
बाबासाहेबांच्या 1947 च्या आर्थिक व राजकीय विचारधारा ह्यावर आधारित आहे. ज्यामध्ये लाेकशाही समाजवादाचा
व समतेवर आधारीत समाज व्यवस्था व संसदीय लाेकशाही ह्यांचा अंगीकार आहे. दुस-या शब्दात सांगायचे म्हणजे,
बी. सी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने बाबासाहेबांनी 1947 मध्ये ‘राज्य आणि अल्पसंख्याक‘ ह्या पुस्तकात नमूद केलेल्या लाेकशाही समाजवादाच्या विचारधारेवर आधारित सर्व समाजवादी धाेरणे स्वीकारली
व आर.पी.आय. च्या मसुद्यात नमूद केली. परंतु लाेकशाही समाजवाद हे आर. पी. आय. चे तात्विक अधिष्ठान असणार
हे लिहिण्याचे टाळले. त्यांनी केवळ एस. सी. ए. च्या 1942 च्या जाहीरनाम्यात नमूद केलेल्या विचारधारेचे
पुर्न:लेखन केले. बी. सी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने केलेली ही सर्वात माेठी चूक हाेती. याचे
परिणाम असे झाले की, बाबासाहेबांना मानणारे आर. पी.आय. आणि इतर राजकीय पक्ष निश्चित तत्वज्ञानाच्या
अभावामुळे दिशाहीन हाेत गेले. याच कारणामुळे दलित वर्गाचे काही राजकीय पक्ष काही राज्यांमध्ये,बाबासाहेब
आंबेडकरांच्या विचारधारेच्या विराेधात असलेल्या राजकीय पक्षांबराेबर सरकार स्थापन किंवा सख्य करतात, किंवा
निवडणूकीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहाय्य करतात. या लेखात हि चुक दुरुस्त करण्याची सूचना करण्यात आली
आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा स्वीकारणाया आर.पी.आय. आणि इतर राजकीय पक्षांनी समाजवादी
आर्थिक व्यवस्था, संसदीय लाेकशाहीची राजकीय व्यवस्था आणि समानतेवर आधारित सामाजिक व्यवस्था यांचा सम
ावेश असलेली विचारधारा स्वीकारली पाहिजे. असा या लेखाचा मतितार्थ आहे. दुस-या शब्दांत सांगायचे तर,
बाबासाहेबांच्या विचारधारेचे पालन करणा-या राजकीय पक्षांनी आर.पी.आय. किंवा इतर वंचितांचे पक्ष यांनी उद्दिष्ट
आणि तत्वज्ञानामध्ये ’लाेकशाही समाजवाद’ ही विचारधारा स्वीकारली पाहिजे व तेच तत्वज्ञान राजकीय पक्षाचा आधार
बनविला पाहिजे.
समाजवादाच्या तत्त्वाच्या आधारावर धाेरणे तयार केली पाहिजे. असेही या लेखात सुचवण्यात आले आहे. लाेकशाही
समाजवादावर आधारित धाेरणांमध्ये आंशिक राज्य मालकी आणि मालमत्तेचे व्यवस्थापन असलेली अर्थव्यवस्था, दलित
वर्ग, सर्व कामगार आणि लाेकांच्या कल्याणाच्या हितासाठी नियमन आणि याेग्य ठिकाणी राज्य हस्तक्षेपाचे धाेरण सामील
आहे. डाॅ. गाैतम कांबळे यांच्या लेखात आर. पी. आय. सारख्या दलित वर्गाच्या राजकीय पक्षांची व इतर राजकीय
पक्षांशी निवडणूक युती करण्याच्या धाेरणावर चर्चा केली आहे. या लेखात शेड्यूल कास्टफेडरेशन (शे.का.फे.)
च्या जाहीरनाम्यात नमूद, राजकीय युतीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे वैचारिक दृष्ट्या व्यक्त केलेल्या
धाेरणात्मक दृष्टिकाेनांवर चर्चा केली आहे. बाबासाहेबांचे मते राजकीय पक्षाला तत्वज्ञान असावे. राजकीय पक्षाचे तत्वज्ञान
लाेकांना एकत्र बांधते. समान तत्त्वे असलेल्या राजकीय पक्षांनी निवडणुकीकरिता एक महासंघ (Federation)
स्थापन केला पाहिजे. समान तत्त्वे असलेल्या नागरी संस्था देखील या महासंघाचा भाग असायला हव्यात. या महासंघाम
ध्ये मात्र दलित वर्गाचे पक्ष व तसेच इतर राजकीय पक्षांची स्वायत्तता आणि अस्तित्व कायम ठेवले पाहिजे. हा विचार
बाबासाहेबांची ब्रिटिश ङरर्लेीी झरीीूं व त्यापूर्वी स्थापन झालेली इग्लंड मधील स्वतंत्र्य मजुर पक्ष (Independent
Labour Party) ह्या मधून घेतला हाेता. या संदर्भात बाबासाहेबांचे मत असे सूचित करते की
आर. पी. आय. सारख्या राजकीय पक्षांनी समान उद्दिष्टे आणि तत्त्वे असलेल्या राजकीय पक्षांशी युती केली पाहिजे. तसेच
आर.पी.आय. आणि इतर दलित वर्गाच्या राजकीय पक्षांच्या तत्त्वांच्या विरुद्ध असलेल्या राजकीय पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडणुकीत ायदा हाेईल अशा प्रकारच्या निवडणुक युतीचे धाेरण अंगिकारणे टाळले पाहिजे. निवडणूक
युतीबाबत बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या विचारांचा अंगीकार करणे राजकीय पक्षांना उपयाेगी ठरेल.
’बहिष्कृत भारत’ ह्या अंकात बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय पक्षाविषयीची भूमिका मांडणारा लेख प्रकाशित
केला आहे. ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, दलितांचा राजकीय पक्षाला निवडणुकीत निवडून येणे किंवा विराेधी
पक्ष म्हणून काम करणे हेच आवश्यक नाही. तर दलितांसाठी धाेरणे बनविण्याकरिता सत्तेत येणे फार आवश्यक आहे.
दलितांनी सत्ता काबीज करणे हे त्यांच्या कल्याणाची गुरुकिल्ली मानली आहे.
–प्रा. सुखदेव थाेरात